राष्ट्रवादी अध्यक्षपदा कोण ? सुप्रिया सुळे की अजित पवार

0
272

मुंबई, दि. २ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याची घोषणा आज (दि. 2 मे 2023) केली आहे. यावेळी शरद पवारांनी निवृतीची घोषणा करताना अनेक गोष्टींवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी पवारांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात थेट निवृत्तीची घोषणा केली. पवारांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण? आणि पवारांनी एवढा मोठा निर्णय का घेतला याची चर्चा आता सुरू झाली आहे. पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, अजित पवार यांना भाजपने पूरते घेरले असून त्यांच्या मदतीने पुढचे सरकार तयार करायचे आणि तिथे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे म्हणजेच अजितदादांकडे द्यायचे असेही ठरल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी हा निर्णय स्वतः पवार यांच्या मनाला न पटणारा असल्याने सरळ अध्यक्षपद रिक्त करून त्या जागेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाध्यक्ष करायचे असे कौटुंबिक बैठकित ठरले आहे, अशीही माहिती हाती आली आहे.

शरद पवार काय म्हणाले?
लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले. मात्र, आपण सामाजिक जीवनातून संन्यास घेत नसून, मी सार्वजनिक सभा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहीन. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली किंवा भारताच्या कोणत्याही भागात असो, मी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी उपलब्ध असेल असे पवारांनी यावेळी सांगितले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन. लोकांचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे.

पवार पुढे म्हणाले, ‘पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मला दीर्घकाळ मिळाली. अध्यक्षपदाची जबाबदारी मी अनेक वर्षे सांभाळली. ही जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आता मी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत आहे.