मेदनकरवाडीत सव्वा नऊ लाखांची घरफोडी

0
340

चाकण, दि. २८ (पीसीबी) – खेड तालुक्यातील मेदनकरवाडी मध्ये अज्ञातांनी घरफोडी करून नऊ लाख 24 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली.

सुरेश ज्ञानेश्वर कानडे (वय 57, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बुधवारी सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून एक लाख 87 हजार 334 रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट, 27 हजार 617 रुपयांची सोन्याची अंगठी, सात लाख रुपये रोख रक्कम असा एकूण नऊ लाख 24 हजार 951 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.