पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
379

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – अक्षरग्रंथ या संस्थेने दिनांक २२ एप्रिल २०२३ पासून गोखले हॉल, चिंचवडगाव येथे आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वीस नामवंत प्रकाशनाच्या सुमारे दहा हजार पुस्तकांचा प्रदर्शनात समावेश आहे. यांमध्ये कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र, पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, पाकशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारातील मराठी भाषेतील प्रथितयश आणि नवोदित लेखकांच्या नव्या अन् जुन्या पुस्तकांचा समावेश आहे.

त्यामुळे सर्व वयोगटातील वाचकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून विशेषतः शालेय सुट्टी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. सकाळी १०:०० ते रात्री ९:०० या वेळेत खुले असलेल्या या प्रदर्शनाचा ०१ मे २०२३ हा शेवटचा दिवस आहे, अशी माहिती चित्रसेन गोलतकर यांनी दिली आहे.