ग्राहक सेवा केंद्राचा ऑनलाईन नंबर काढले पडले महागात

0
172

बावधन, दि. २५ (पीसीबी) – बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा हेल्पलाईन क्रमांक ऑनलाईन माध्यमातून काढणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. फोनवरील ग्राहक सेवा प्रतिनिधीने व्यक्तीकडून बँकेची गोपनीय माहिती घेत खात्यातून अडीच लाख रुपये काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार 15 फेब्रुवारी रोजी बावधन येथे घडला.

सुधाकर गुंडू हावळ (वय 80, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9875302911, 7001736905, 9875393622 या क्रमांकावरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या कॅनरा बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे फिक्स डीपॉझीट करायचे होते. त्यासाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी ऑनलाईन माध्यमातून बँकेचा ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक शोधला. त्यावर संपर्क केला असता फोनवरील व्यक्तीने फिर्यादीकडून त्यांच्या युनियन बँकेच्या खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून दोन लाख 49 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ऑनलाईन माध्यमातून शोधलेला ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक फसवा असल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.