संरक्षण क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

0
368

निगडी, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये प्रवेश घेऊन देशसेवेत जाण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमी मध्ये दरवर्षी प्रशिक्षण सत्र (क्रॅश कोर्स) राबविले जाते. यावर्षीच्या एनडीए प्रवेश परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमी सन 2017 पासून एनडीए मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण सत्र राबवित आहे.

रविवारी (दि. 23) स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमीमध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची बैठक झाली. या बैठकीत इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमीच्या शिक्षकांतर्फे पालक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमीमध्ये ब्रिगेडियर बलजीत सिंह गिल आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शिकवले जाते. क्रॅश कोर्स हा साधारण 45 दिवसांचा असतो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची एनडीए आणि एसएसबी मध्ये भरती होण्यासाठी लागणारी शैक्षणिक आणि शारीरिक तयारी करून घेतली जाते. सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या एनडीएच्या लेखी परीक्षेसाठी प्रशिक्षण 25 एप्रिल पासून सुरू होणार आहे. जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा असे स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमीने आवाहन केले आहे. एनडीए मध्ये लागणारे गणित व सामान्यज्ञान या विषयांची स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमीमध्ये तयारी करून घेतली जाते.

बाहेरच्या गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेण्यासाठी काही निकष आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वयोगट. 2 जानेवारी 2005 ते 1 जानेवारी 2008 या कालावधीत जन्मलेले विद्यार्थीच क्रॅश कोर्ससाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्र कोणतेही असेल तरी त्यात गणित हा विषय असणे बंधनकारक आहे.

साहिल बिरजे, आनंद जाधव, अथर्व ओझर्डे, मयूर कोल्हे, देऊन शिंदे, यश वाघ आदी विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमी यांच्या मार्गदर्शनामुळे एनडीए मध्ये प्रवेश झाला आहे. त्याचबरोबर अकॅडमीच्या मार्गदर्शनाच्या मदतीने वरद कतळंबेकर, विजय भामे, ऋषिकेश भामरे, सागर घोरपडे, नीरज पोतदार आदी विद्यार्थ्यांनी एनडीएच्या लेखी परीक्षेत यश मिळवले आहे