मुंबई, दि. २४ (पीसीबी) – 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या कामगिनेत्यांनी घेतला आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते. असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवारांनी टाकलेली गुगली सर्वांना संभ्रमात पाडत आहे. अशातच त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
त्यांच्या या व्यक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर नाना पटोले, संजय राऊत यांच्यासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्याही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यानंतर शरद पवार यांच्या या वक्तव्यावर त्यांनी स्वत: या वक्तव्यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ते म्हणाले की,’ माझ्या व्यक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला आहे. महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही. महाविकास आघाडी टिकून राहावी हाच माझा प्रयत्न असल्याचं शरद पवार यांनी म्हंटलं आहे. तर माझ्या व्यक्तव्याचा विपर्यास नको असंही ते यावेळी म्हणालेत.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या कामगिनेत्यांनी घेतला आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते. असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवारांनी टाकलेली गुगली सर्वांना संभ्रमात पाडत आहे. अशातच त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
अमरावतीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार, एकत्र लढण्याची इच्छा आहे. मात्र केवळ इच्छा पुरेशी नसते, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आताच सांगता येणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.