शरद पवार यांच्या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

0
178

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी घेतला आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते. असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवारांनी टाकलेली गुगली सर्वांना संभ्रमात पाडत आहे. अशातच त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महात्मा फुले ॲग्रिकल्चर फोरमच्यावतीने अमरावतीमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटनेच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, यावेळी बोलताना ते म्हणाले कि, कोणाला फोडाफोडीचे राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावं, आम्ही आमची भूमिका घ्यायची ती घेऊ. तर राहुल गांधी यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्यावर कर्ज बुडवल्याप्रकरणी जेपीसी नेमण्याच्या मागणी विषयी बोलताना जेपीसी हा त्यावरील तोडगा नसल्याचंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने भेट झाल्याच्या चर्चेला त्यांनी दुजोरा दिला.

तर 2024 च्या निवडणुका मविआ एकत्र लढेल का? तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत येईल का? असा प्रश्न पवार यांना उपस्थित करण्यात आला. ”वंचित आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती फक्त कर्नाटकातल्या मर्यातीद जागांविषयी झाली. दुसरी कसलीही चर्चा नाही असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
तसेच, एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांच वाटप, त्यामध्ये काही विषय. हे अजून केलंच नाही. तर कसं सांगता येईल. मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू? असं मोठं विधान पवार यांनी केलं आहे.