आईचा हिस्सा मागत एकावर कुऱ्हाडीने वार

0
217

चाकण, दि. २१ (पीसीबी) – पहाटेच्या वेळी एका व्यक्तीच्या घरासमोर जाऊन आमच्या आईचा हिस्सा दे, असे म्हणत त्यावर कुऱ्हाडीने वार केले. तसेच मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 19) पहाटे चार वाजता खेड तालुक्यातील खालुम्ब्रे येथे घडली.

अनिल दामोदर घनवट, सतीश अशोकराव वानखेडे, अक्षय सर्वगोड (सर्व रा. खालुम्ब्रे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अशोक सुरेश तुळवे (वय 37) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे चार वाजता झोपेतून उठून फिर्यादी घराबाहेर आले. त्यावेळी आरोपी तिघेजण फिर्यादी यांच्या घराच्या बाहेर थांबले होते. फिर्यादी यांनी आरोपींना एवढ्या सकाळी घरी येण्याचे कारण विचारले असता, माझ्या आईचा हिस्सा दे, असे म्हणून अनिल घनवट याने फिर्यादीवर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर सतीश आणि अक्षय यांनी फिर्यादीस हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान भांडणाच्या आवाजाने फिर्यादी यांच्या घरातील इतर सदस्य घराबाहेर आले असता आरोपी तिथून पळून गेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.