जेष्ठ पत्रकार मनीष उंब्रजकर यांचे निधन, शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार

0
341

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – जेष्ठ पत्रकार मनीष उंब्रजकर (वय-५३ ) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. गेली तीस वर्षे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सकाळ, इंडिनय एक्सप्रेस, टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रांतून त्यांनी पत्रकारिता केली. शनिवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर कासरवाडी येथील स्मशानात अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत.

वाचकांची पत्र लिहीतानाच पत्रकारितेची आवड निर्माण झाली. पुढे पुणे विद्यापीठातून कम्युनिकेशन जर्नालिझममध्ये पीजी पदवी घेतली आणि दै. सकाळ मधून त्यांनी बातमीदारी सुरू केली.

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये विशेष वार्ताहर म्हणून त्यांची कारकिर्द विशेष लक्षवेधी ठरली. पुणे तसेच पिंपरी चिंचवडमधील वाहतूक आणि वाहतूक, रेल्वे, पर्यावरण, राजकीय आणि नागरी समस्यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण बातम्या देऊन प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले.