निघोजे, दि. २० (पीसीबी) – व्हॉटसअप वर माहिती टाकतो म्हणून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार निघोजे येथे मंगळवारी (दि.18) रात्री घडली आहे.
मंगेश रामानाथजी पराते (वय 42, रा. चिखली) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज प्रभाकर हराळे (वय 23, रा. चिंचवड), सागर प्रभाकर हराळे (वय 29, रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कंपनीतून घरी जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला आडवले. यावेळी त्यांनी ‘तुला लय माज आला का तू नेहमीच ट्रान्सपोर्टच्या गाड्यांचे शॉर्टेज बाबत माहिती व्हाट्सअप ग्रुपवर का टाकतो’ असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादींना हाताने माराहण करत गाडीच्या चावीने मारून जखमी केले. परत अशी माहिती टाकायची नाही, पोलीस तक्रार दिली तर परत काम करू देणार नाही., अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.










































