तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

0
299

निगडी ,दि. २० (पीसीबी) – दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला निगडी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. १९) पहाटे ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे करण्यात आली.

युवराज रतन राजपुरोहित (वय २४, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सोनू केंगले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ट्रान्सपोर्ट नगर परिसरात गस्त घालत असताना एकजण शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी युवराज राजपुरोहित याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळून आला. पोलिसांनी कोयत्यासह त्याला अटक केली. युवराज याला १० जुलै २०२१ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो बेकायदेशीरपणे शहरात आला असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.