क्रिकेट बेटिंग प्रकरणी तळेगाव मधून तिघांना अटक

0
319

तळेगाव दाभाडे, दि. २० (पीसीबी) – खंडणी विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे येथे कारवाई करत क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या तिघांना अटक केली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोमी सुरेश नेहलानी (वय 36, रा. पिंपरी, पुणे), विनोद राजु सतिजा (वय 32, रा. पिंपरीगाव, पुणे), लखन राजु गुरुबानी (वय 24, रा. पिंपरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील लेक पॅराडाईज सोसायटी मधील एका रो हाऊस मध्ये क्रिकेट बॅटिंग घेतली जात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये सात मोबाईल फोन, एक लॅपटॉप, पाच वह्या, दोन पेन आणि चार हजार 500 रुपये रोख रक्कम असा एकूण 96 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, विजय नलगे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, प्रदीप गुट्टे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी यांनी केली आहे.