स्त्री आदिशक्तीचे रूप _फत्तेचंद रांका

0
247

पुणे, दि. २० (पीसीबी) – बालगंधर्व येथे कर्तुत्वान महिलांचा व समाजसेवी संस्थांचा पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील संस्थांचा कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळ्यानिमित्त फत्तेचंद रांका बोलत होते.यावेळी ते म्हणाले की स्त्री ही बहीण ,आई, पत्नी, मुलगी अशा वेगवेगळ्या रूपात आपणास पाहावयास मिळते आजकाल खुरपणी पासून ते नासापर्यंत स्त्रिया कार्यरत आहे ,पुरुषापेक्षा जास्त ताणतणावात स्त्रियाच असतात त्यामुळे त्यांना किडनीचे आजार अधिक प्रमाणात होतात,अनेक गोरगरीब महीलाचे किडनी फेल प्रमाण अधिक असून त्यांच्या उपचारासाठी मी.नेहमीच मदत करत आसतो,आपले घर सांभाळून नोकरी करून मुलावर योग्य संस्कार करते ती आई असते ,अशा कर्तृत्ववान स्त्रियांचा व संस्थांचा माझ्या हस्ते सन्मान होतोय हे माझी भाग्य आहे असे ते यावेळी म्हणाले .

लिज्जत पापडची मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते यांनी सांगितले की माझ्या उद्योगात 70 टक्के महिला कार्यरत असून अनेक महत्त्वाच्या पदावर महिलाच जास्त कार्यक्षमतेने काम करत आहेत.कुठेही महिला मागे नाहीत. अशा महीलांचा व समाज उपयोगी काम करणाऱ्या संस्थाचा यथोचित पुरस्कार देऊन सन्मान होतोय हि आभिमानाची गोष्ट आहेयाचा मला सार्थ आभिमान आहे.

यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या पिंपरी चिंचवड शहराच्या कमेटीला कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट ,वुमन्स लिबर्टी चॅरिटेबल ट्रस्ट ,लिप्रसी रीबॅग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने बालगंधर्व पुणे येथे पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले .यावेळी जयंती हिरे सामाजिक कार्यकर्ते यांच्या “कर्तृत्वान महिलांच्या यशोगाथा” या पुस्तकाचे रूपाली वांबुरे, सुरेश कोते, फत्तेचंद रांका यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले .
मानवी हक्क आणि संरक्षण जागृतीच्या वतीने सस्थाध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड उपाध्यक्ष विकास शहाणे,महिला अध्यक्षा मीना करंजवणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी ,आळंदी शहर सचिन रवी भेंकी, सामाजिक कार्यकर्ते धनंजय महाले इत्यादींनी हा संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.