भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्त्या सिताताई केंद्रे यांची निवड.

0
398

पिंपरी दि. 20 (पीसीबी) -चिखली जाधववाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीताताई केंद्रे यांची आम आदमी पार्टीच्या भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

आपचे शहर कार्यकारी दत्तात्रय काळजे यांनी त्यांना नेमणुकीचे पत्र दिले.
संघर्ष मित्र मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून त्या गेली दहा वर्षे एकल गोरगरीब महिला,निराधार वृद्ध याना मदत करत आहेत. घरेलू,अंग मेहनती,श्रमिक कुटुंबांना अडीअडचणीच्या वेळी बचतगटाच्या माध्यमातून कार्य करत आहेत.चिखली जाधववाडी येथे त्यांचे १५ हुन जास्त सक्रिय बचत गट आहेत,कोरोना काळातील त्यांनी सलग सहा महिने शिधा वाटप केले होते.

रायगड जिल्ह्यातील महाड निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित गावामधील कुटुंबांना त्यांनी संसारोपयोगी साहित्य व किराणा,कपडे साड्या याचे वितरण केले होते. सामान्य जनतेच्या आशा आकांक्षा आम आदमी पार्टी पूर्ण करू शकते.त्यामुळे मी भोसरी विधानसभा मतदार संघातील महिला आघाडीचे काम करू इच्छिते,असे सीताताई केंद्रे यांनी सांगितले.

यावेळी चेतन बेंद्रे कार्यकारी अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर , दत्तात्रय काळजे, कार्यकारी अध्यक्ष,भोसरी,यशवंत कांबळे, कार्यकारी अध्यक्ष, चिंचवड,संतोष इंगळे, कार्यकारी अध्यक्ष-पिंपरी,ब्रम्हानंद जाधव, युवा अध्यक्ष,पिं.चिं शहर,स्वप्निल जेवळे,डॉ.अमर डोंगरे,कमलेश रणवरे,प्रकाश हगावणे,राहुल नाईक तसेच संघर्ष मित्र मंडळ ट्रस्टचे दत्तात्रय सांगवे,माया सांगवे,ओम डांगे,बालाजी कांबळे
आदी उपस्थित होते.