उद्योजक गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट

0
313

मुंबई, दि. २० (पीसीबी) – उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. सिल्वर ओकवर दोघांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दोघांच्यातील चर्चा अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अधिक जवळ आल्याचे हे प्रमुख लक्षण असल्याचे मानले जाते.

उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत हिंडनबर्ग चा अहवाल आला होता त्यावेळी संसदेत संयुक्त चौकशी समिती नियुक्ती (जेपीसी) करण्याची मागणी झाली होती. शरद पवार यांनी त्या विरोधात मत मांडले आणि अदानी यांची बाजू सुरक्षित केली म्हणून गहजब माजला होता. जेपीसी नको, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी घेतली होती आणि त्याचा फायदा भाजपला होणार होता. त्यामुळे महाआघाडी मधील सर्व घटकपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. अदानी यांनी त्या सर्व पार्श्वभूमिवर थेट पवार यांचे भेट घेणे हे विशेष मानले जाते.