अजित पवार पक्षाच्या शिबिराला अनुपस्थित, मात्र चिंचवडला प्रकट मुलाखतीला हजेरी लावणार

0
217

मुंबई, दि. २० (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार चांगलेच चर्चेत आले आहेत. अजित पवार बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन करणार अशा वावड्या उठत होत्या. त्यांनी पत्रकार परिषद घेत चर्चेला पुर्णविराम दिला. दरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या उद्या होणाऱ्या शिबीर पत्रकात अजित पवारांच नावं नसल्याने. पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अजित पवार हे उद्या दै. सकाळ तर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित जाहीर मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत. दादा पवार यांंच्यावर आता माध्यमांची नजरा खिळून असल्याने त्यांच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालींवर लक्ष आहे.

सदर शिबीराच्या पत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सदर शिबीराचे उद्घाटन माननीय प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात येईल. तसेच, खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत व राजकीय वक्ते यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने हे शिबीर पुढे कार्यरत होणार आहे. मात्र, यासर्वात अजित पवारांचे नाव वगळल्याने पुन्हा राज्यात खळबळ माजली आहे.