बँकेने ताबा मारलेल्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा

0
224

चिखली, दि. १९ (पीसीबी) – कर्जदाराने कर्जफेड न केल्याने बँकेकडे गहाण असलेल्या मिळकतीवर बँकेने ताबा मारला. हा प्रकार माहिती असूनही दांपत्याने बेकायदेशीरपणे घरात अतिक्रमण केले. याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 18) सायंकाळी राजे शिवाजीनगर चिखली प्राधिकरण येथे घडली.

संजय नारायण पवार आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्रसिंग भाऊसिंग जगताप (वय 50, रा. चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एनकेजीएसबी बँकेकडून कर्ज काढले आहे. या कर्ज प्रकरणामध्ये आरोपींनी राजे शिवाजीनगर येथील एक मालमत्ता तारण ठेवली होती. आरोपींनी वेळेत कर्जफेड न केल्यामुळे बँकेने कायदेशीर प्रक्रिया करून सदर मिळकतीवर ताबा मारला. हा प्रकार माहिती असूनही आरोपींनी बेकायदेशीरपणे सीलबंद कुलूप तोडून मिळकतीत प्रवेश केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.