जपान दौरा अर्ध्यावर सोडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तातडिने बोलावले

0
295

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – जपान दौरा अर्ध्यावर सोडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज मुंबईत येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याच्या राजकीय घडामोडीत नार्वेकर मुंबईत येणार म्हणजे राज्यात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेले आहेत.

दरम्यान, राज्यात अजित पवार भाजपसोबत नवी सत्ता स्थापन करणाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच राहुल नार्वेकर यांना तातडीने बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे नार्वेकर जपान दौरा अर्ध्यावर सोडून मुंबई तातडीने येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व बातम्या पेरलेल्या आहेत, त्या कपोलकल्पीत, तथ्यहिन असल्याचा खुलासा केला. बातम्यांचा विपर्यास सुरू आहे.