मारहाण केल्याच्या संशयावरून दोघांना बेदम मारहाण

0
1485

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मित्राला मारहाण केल्याच्या संशयावरून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री नऊ वाजताच्या सुमारास कामगार भवन गांधीनगर पिंपरी येथे घडली.

हर्षवर्धन रामभाऊ रणीत (वय 19 रा. दिघी), ऋषिकेश राजू गायकवाड (वय 23, रा . सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी हर्षवर्धन यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार तीन ते चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी आरोपींच्या कोणत्यातरी मित्राला मारहाण केल्याचा आरोपींना संशय होता. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. आरोपींपैकी एकाने धारदार हत्याराने फिर्यादी यांच्या पाठीत वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांचा मित्र ऋषिकेश याला देखील धारदार हत्याराने मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.