अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0
242

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 28 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने विरोध केला असता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार मे 2020 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत महात्मा फुले नगर, चक्रपाणी वसाहत भोसरी आणि लोहगाव येथे घडला.

भिकन उर्फ गौरव विष्णू जाधव (वय 28, रा. देवकर वस्ती भोसरी. मूळ रा. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 18 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या नातेवाईकांकडे गेली असताना तिथे वॉटर सप्लायचे काम करणारा आरोपी जाधव याने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीने आरोपीला विरोध केला असता आरोपीने फिर्यादीला मारहाण केली. फिर्यादीने आरोपीला विरोध केला असता आरोपीने फिर्यादीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.