दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या दोघांना अटक

0
208

रावेत, दि. १६ (पीसीबी) – दुचाकी वरून जाणारे एका व्यक्तीला दोघांनी मिळून लुटले. दुचाकीची कारला धडक बसली असल्याचे सांगत दमदाटी करून दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास रावेत येथे घडला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

संतोष गोरख सावंत (वय 35, रा. पुनावळे), मनोहर सुभाष पाटोळे (वय 35, रा. थेरगाव) अशी अटक केलेले आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ओमकार रामनाथ शुक्ला (वय 36, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुनावळे येथे काम पाहण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते रावेत येथे आले असता रस्त्याच्या बाजूला थांबले. तिथून पुढे जात असताना कारमधून आलेल्या दोघांनी फिर्यादीस अडवले. दुचाकीचा कारला धक्का लागल्याचे सांगत आरोपींनी फिर्यादीकडे तेरा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करत त्यांची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.