घरफोडी करून एक लाखाचा ऐवज लंपास

0
368

सांगवी, दि. १४ (पीसीबी) – घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ९ ते १३ एप्रिल या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली.

संदीप गोपाल टाक (वय ३९, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कुटुंबातील सर्वजण सुरत येथे गेले होते. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्या कालावधीत अज्ञातांनी फिर्यादी यांचे घर फोडून घरातून सोन्याचे दागिने, टीव्ही, रोख रक्कम असा एकूण एक लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.