आकुर्डीतील २२० महिला कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

0
220

आकुर्डी, दि. १३ (पीसीबी) – शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डीतील २२० महिला-भगिनींनी शिवसेनेत प्रवेश केला.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे. यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डीत हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. बाळासाहेब वाल्हेकर,माडी नगरसेविका उर्मिलाताई काळभोर,शिवसेना शहरसंघटीका सौ सरिताताई साने,पिंपरी विधानसभा संघटिका सौ.शैलाताई निकम,शिवसेना विभागप्रमुख श्री. फारुख शेख इतर पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सौ.अश्विनीताई बागुल,रेश्मा लोंढे,सिमा यादव,पुष्पा चव्हाण,रंजना सोनवणे,सावित्री कदम,वैष्णवी काळभोर,शोभा वायकर यांनी केले.