महिलेची गाडी अडवून तिच्याशी गैरवर्तन करत शिवीगाळ

0
318

चऱ्होली , दि. १२ (पीसीबी) –  जुन्या भांडणातून महिलेची गाडी अडवून तिला शिवीगाळ तसेच तिच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी वडमुखवाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन तापकीर (वय ३८, रा. चऱ्होली) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याचे वडिल व भाऊ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपीने फिर्यादीची दुचाकी आडवली. त्यांना शिवीगाळ केली. तसेच आम्ही गाववाले आहोत, असे म्हणून महिलेशी गैरवर्तन केले. तसेच पोलीसात तक्रार देऊ नये म्हणून फिर्यादीचे पती व दिर यांना देखील धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.