घरफोडी करून पाऊण लाखाचा ऐवज लंपास

0
260

निगडी, दि. १२ (पीसीबी)-  घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी गंगानगर, निगडी येथे उघडकीस आली.

याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर रविवारी रात्री नऊ ते सोमवारी सकाळी आठ वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप कापून घरात प्रवेश केला. घरातून ३० हजारांचे सोन्याचे दागिने, २५ हजारांच्या चांदीच्या वस्तू आणि १५ हजार रोख रक्कम असा एकूण ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.