फुलेे जयंतीला पाच हजार किलोची मिसळ वाटप

0
283

पुणे, दि. ११ (पीसीबी) : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी पाच हजार किलोची मिसळ तयार केली आहे. पहाटे तीन वाजल्यापासून मिसळीच्या तयारीला सुरुवात झाली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कढईमध्ये सर्व पदार्थ आणि मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले वाडा येथे अभिवादनाकरिता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळवाटप करण्यास सुरुवात झाली. या उपक्रमामध्ये पाच हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मिसळ मसाला १३० किलो, लाल मिरची पावडर २५ किलो, हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो, खोबरे कीस ७० किलो, तमालपत्र पाच किलो, फरसाण १२०० किलो, पाणी चार हजार लिटर, कोथिंबीर ५० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले आहे.

माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीधर चव्हाण, संजय बकरे, महेंद्र मारणे, रमएश काथवटे, सचिन पवार, रविंद्र गुडमेट्टी, शेखर काळे, संदेश काथवटे, यश बकरे, जयेश कसबे, महेंद्र मारणे, विराज चव्हाण, सोमनाथ कोकणे, विश्वास चव्हाण यांनी संयोजन केले आहे.