देहूरोड पोलिसांनी पकडला पाच किलो गांजा

0
304

देहूरोड दि. 11(पीसीबी) –  गस्तीवर असलेल्या देहूरोड पोलिसांनी पाच किलो गांजा पकडला. ही कारवाई सोमवारी (दि. १०) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास देहूरोड येथे करण्यात आली.

विकास मालसिंग सेनानी (वय १९), अनिल शोभराम सेनानी (वय २३, दोघे रा. विठ्ठलवाडी देहूरोड. मूळ रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई स्वप्नील साबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस सोमवारी सायंकाळी देहूरोड परिसरात गस्त घालत असताना जीवनरेखा हॉस्पिटल येथे दोघेजण संशयितरित्या जाताना दिसले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाच किलो वजनाचा एक लाख २५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.