घरकुल,चिखली मध्ये वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावा – मा.क.प.

0
242

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) घरकुल-चिखली येथे येथे दि. ४ एप्रिल रोजी पडक्या इमारतीत १७ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला.या ठिकाणी गुंडगिरी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. दर आठवडयात भांडणे,मारामारी या कृत्यांनी येथील राहणा-या नागरीकांना प्रचंड त्रास होत आहे.येथील महीला,मुली यांच्याही संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

आपण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सीसीटीव्ही लावावेत.याचा फायदा पोलिस प्रशासनालाही गुंडगिरीला आळा घालण्यास मदत होईल व कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील या सगळ्या मागण्यांनासाठी मा.क.प.ने पालिकेला निवेदन देऊन विनंती केली त्यावेळी प्रदीप जांभळे-पाटील अतिरिक्त आयुक्त यांनी व्यवस्था करू असे आश्वासन दिले.लवकरात लवकर सि.सि. टी. व्ही. कॅमेरे लावावेत,अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे.यासंदर्भात तातडीने मागणी पूर्ण करावी,अन्यथा महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्रआंदोलन करावे लागेल.अशा इशारा मा.क.प.ने दिला आहे.यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना ने दिला यावेळी मा.क.प.चे पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे, अविनाश लाटकर,बाबासाहेब देशमुख,अमिन शेख,अपर्णा दराडे इ.पदाधिकारी उपस्थित होते.