वेअर हाऊसमधून पाच लाखांचे साहित्य चोरीला

0
299

खेड, दि. ११ (पीसीबी) –  खेड तालुक्यातील कुरुळी येथे आरवीसी सप्लाय चेन सोल्युशन कंपनीच्या वेअर हाऊस मधून अज्ञातांनी पाच लाख १९ हजार २७८ रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना ६ एप्रिल रोजी मध्यरात्री दोन ते सकाळी साडेदहा वाजताच्या कालावधीत घडली.

कल्पेश रणजितसिंह वेद (वय ५३, रा. वाकड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आरवीसी सप्लाय चेन सोल्युशन कंपनीच्या वेअर हाऊस मध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्ह्णून काम करतात. ६ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याने वेअर हाऊसच्या मागील बाजूच्या खिडकीच्या काचा तोडून गज कापून आत प्रवेश केला. वेअर हाऊस मधून चोरटयांनी एलईडी टीव्ही, लॅपटॉप आणि अन्य साहित्य असे एकूण पाच लाख १९ हजार २७८ रुपयांचे साहित्य चोरून नेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.