पिंपरी दि. 11(पीसीबी) – बहुजनांचा सामाजिक व आर्थिक विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षण नसल्यामुळेच या वर्गाचे शोषण आणि पिळवणूक केली जाते म्हणून बहुजन समाज शिकून शहाणा झाला पाहिजे हे हित महात्मा फुले यांनी जाणले शाळांची पायाभरणी केली कामगारांच्या अस्मितेला त्यांनी अधिक महत्त्व दिले त्यांना हक्काची जाणीव करून दिली म्हणून अनेक विषयांत अतुलनीय कार्य केले महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक होते असे गौरवोद्गार कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघ, नॅशनल हॉकर फेडरेशनच्या वतीने आज महासंघाचे कार्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघटक अनिल लोखंडे,नाना कसबे,ओमप्रकाश मोरया, मुकेश राऊत,फरीद शेख, सतीश मस्तुद,जयश्री जाधव,कृष्णा जाधव,मंगल खेडेकर,सतीश जाधव,भूषण कांबळे गणेश माने,विनोद शिंदे सुगंधा चव्हाण आदी उपस्थित होते.
पुढे नखाते म्हणाले की महात्मा फुले यांनी कामगारांच्या प्रश्नांना अधिक महत्त्व दिले त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन मूठभर भांडवलदाराच्या विरोधात लढा देण्यासाठी मानसिक दृष्ट्या अधिक सक्षम केले. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले शेतकरी, शेतमजूर, कामगारांचे दुःख व दारिद्र्याचे निर्मूलन करणारे ते पहिले आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांचे ” गुलामगिरी ” पुस्तक आजही अत्यंत मार्गदर्शक ठरते, कनिष्ठ वर्गातील माणसाला माणूस म्हणून जगवण्याचा चे धाडस त्यांनी दिले सामान्यांच्या न्यायासाठी लढणारा लढणारे हे समाज सुधारक कायम स्मरणात राहतील.