मुंबईः, दि. १० (पीसीबी) – देशासह राज्यामध्ये कोरोना वरचेवर वाढतांना दिसून येत आहे. विशेषतः मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्याच अनुषंगाने आज मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी मास्कसक्तीचा निर्णय घेतला आहे.
आयुक्त इक्बाल चहल यांनी आज एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये महानगर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे.
बीएमसी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आलेला आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिली आहेत. मुंबई पालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्ड सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. काही दिवसांपासून दररोज ८००च्या पुढे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.