विद्युत पुरवठ्याचे काम करण्यासाठी मागितली 30 लाखांची खंडणी

0
140

पिंपरी, दि. २ (पीसीबी) -कंपनीला विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचे काम सुरु असताना महावितरणच्या कंत्राटदाराला अडवून कंपनीकडे 30 लाखांची खंडणी मागितली. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 1 एप्रिल 2023 या कालावधीत मावळ तालुक्यातील बेबडओहळ येथे घडला.

विद्याशंकर शंभूनाथ द्विवेदी (वय 65, रा. बेबडओहळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण रंभाजी घारे, परशुराम रंभाजी घारे, रंभाजी आबाजी घारे (सर्व रा. बेबडओहळ, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गंगा पेपर्स इंडिया लि या कंपनीत अधिकारी पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीला महावितरणकडून विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचे काम केले जात आहे. काम करत असताना आरोपींनी कंत्राटदाराला अडवून काम करण्यास मज्जाव केला. तसेच काम करून देण्यासाठी फिर्यादीकडे 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. ही माझी जमीन आहे. माझ्या जागेत पाय ठेवाल तर पाय तोडीन, अशी आरोपींनी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.