-राहुल गांधींच्या समर्थनार्थ पिंपरीत काँग्रेसचा मूक मोर्चा
पिंपरी, दि. २ (पीसीबी): घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समर्पित केलेल्या घटनेनुसार भारतातील नागरिकांना जे मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. हे अधिकार हुकुमशाही पद्धतीने दडपून टाकण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करीत आहे. या हुकूमशाही सरकारला त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीपासून ते संसदेतील खासदारांपर्यंत कोणालाही व्यक्त होऊ द्यायचे नाही. त्यांच्या विरोधात कोणीही बोलायचे नाही जर कोणी त्यांच्या विरोधातील प्रश्न उपस्थित केले, तर त्यांच्या मागे बेकायदेशीर रित्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा लावून त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.
या दडपशाहीला काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी कदापिही घाबरणार नाहीत. तसेच देशातील कोट्यावधी जनता खासदार राहुल गांधी यांना समर्थन देत आहे. त्यामुळे शहरभर सुरू असणाऱ्या स्वाक्षरी मोहिमेत हजारो नागरिकांनी हम आपके साथ है अशी प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांना समर्थन दिले आहे. तसेच शनिवारी पिंपरी कॅम्प परिसरातून काढलेल्या या मूक मोर्चात हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. अशाच पद्धतीने महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशात आता नागरिक राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरत आहेत. आता रविवारी २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता थेरगाव डांगे चौक येथे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. यात देखील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले. खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात सुरत येथील न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही सरकारने खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी पिंपरी कॅम्प परिसरातून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढण्यात आला.यावेळी सहभागी झालेल्या नागरिकांनी तोंडावर काळ्याफिती बांधून केंद्र सरकारचा निषेध करीत अशोक थिएटर, जायका, चौक, साई चौक, आर्य समाज चौक, कराची चौक, रिव्हर रोड, वाल्मिकी चौक, मुख्य बाजारपेठ, शगुन चौकातून डिलक्स चौक या मार्गावर हा मुक मोर्चा काढला. समारोप प्रसंगी डिलक्स चौकात सभा घेण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज साठे, माजी महापौर कविचंद भाट, मा. नगरसेवक विश्वास गजरमल, महिला अध्यक्षा सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष विशाल सरवदे, मागासवर्गिय सेल अध्यक्ष विजय ओव्हाळ, डॉ. मनिषा गरुड, आशा भोसले, निर्मला खैरे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, वैशाली शिंदे, रिटा फर्नांडिस, सीमा हलकट्टी, उमेश बनसोडे, किरण नढे, बाबासाहेब बनसोडे, सौरभ शिंदे, स्वप्नील बनसोडे, रोहित शेळके, मिलिंद बनसोडे, रवि कांबळे, आकाश शिंदे, रवि नांगरे, मिलिंद फडतरे, झुबेर खान, हरीश डोळस, गौतम ओव्हाळ, सतीश भोसले,विजय इंगळे, दहर मुजावर तसेच बहुसंख्य महिला भगिनींनी या मुकमोर्चात सहभाग घेवून केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला.