कंपनीत राडा घालणाऱ्या टोळक्यावर गुन्हा

0
235

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)-  कंपनीत येऊन वाद घालणाऱ्या सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी मिंडेवाडी नवलाख उंबरे येथील बोनफिगलोली बी टी पी एल या कंपनीत घडली.

विनोद अशोक भेगडे समीर गुलाबराव भेगडे सुमित गुलाबराव भेगडे वामन अशोक भेगडे जालिंदर अशोक भेगडे विशाल गंगाराम भेगडे सर्व रा तळेगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बळीराम मारुती मराठे (वय 39) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून कंपनीमधील क्रेनच्या कॉन्ट्रॅक्टच्या आपसातील वादातून लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दगड फेकून मारत कंपनीत राडा घातला. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. फिर्यादी यांना आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.