घरफोडी करून सव्वा लाखांचे दागिने लंपास

0
243

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- घरफोडी करून दोन अनोळखी चोरट्यांनी घरातून एक लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 16 मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास विजय नगर काळेवाडी येथे घडली.

संजीत कुमार वशिष्ठप्रसाद सिंह (वय 43, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 30) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या गावी गेले असताना दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घोरफोडी केली. एक लाख 25 हजार रुपये किमतीचे 50 ग्रॅम मोजण्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. फिर्यादी गावाहून परत आल्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.