काळाखडक येथून सव्वा लाखांचा गावठी दारूसाठा जप्त

0
218

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- काळाखडक वाकड येथून वाकड पोलिसांनी सव्वा लाखांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. 29) रात्री दहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

संदीप रामकिशोर सरोज (वय 45, रा. कुदळवाडी पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अतिक शेख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप सरोज याने त्याच्या ताब्यात एक लाख 26 हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगली. आरोपी संदीप ही दारू त्याच्या पिकप मध्ये घेऊन जात असताना पोलिसांनी त्यास पकडले. पोलिसांनी सव्वा लाखांची दारू आणि सात लाख रुपये किमतीचा पिकप टेम्पो असा एकूण आठ लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.