जागा विक्रीच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

0
429

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- जागा विक्रीच्या पाहण्याने व्यावसायिकाकडून 19 लाख 65 हजार रुपये घेऊन जागा न देता फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर 2019 ते 30 मार्च 2023 या कालावधीत खराळवाडी पिंपरी येथे घडला.

वैभव दिलीप चव्हाण (वय 29, रा. कासारवाडी पुणे) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पूर्णचंद्र सनातन स्वाईन, प्रिन्स पूर्णचंद्र स्वाईन, एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना मावळ तालुक्यातील डोणे गावातील 22 हजार चौरस फूट जागा विकत देण्याचे ठरविले. त्याबाबतचे रजिस्टर साठेकर करून त्या जागेसाठी फिर्यादी यांच्याकडून 19 लाख 65 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना जागा न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.