संभाजीनगर, दि. ३१ (पीसीबी) – छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे. येत्या 2 तारखेला संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ही सभा होऊ नये म्हणूच संभाजीनगरात तणाव निर्माण करण्यात आला आहे. तसेच छ. संभाजीनगरसह देशात भाजप पुरस्कृत दंगली, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.
आरोप करतानाच संभाजीनगरसह देशात ज्या दंगली झाल्या त्या भाजप पुरस्कृत होत्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
संजय राऊत काय म्हणाले?
येत्या 2 एप्रिलला रोजी महाविकास आघाडीची संभाजीनगरात सभा आहे. ती होऊ नये, कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली सभा होऊ नये. त्यासाठी कारस्थान सुरू आहे. काल मुंबईतही मालवणीतही दोन गटात तणाव झाला. यापूर्वी रामनवमी होत होती. गुढी पाडवा होत होता. पण खेड, मालेगावमध्ये आमच्या सभेला लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे.
ते पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण नसताना जातीय धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. हा त्यांच्या नपुंसकतेचा पुरावा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.