पीएमपी बस प्रवासात वृद्धाची सोनसाखळी पळवली

0
288

पिंपरी, दि.२९ (पीसीबी) – पीएमपी बसमधून प्रवास करत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी चिंचवड स्टेशन ते आंबेडकर चौक पिंपरी या दरम्यान घडली.

फकीरराव गणपत साहने (वय 75, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी व मित्र यांच्यासोबत संभाजी उद्यान डेक्कन येथे पीएमपी बसने जात होते. ते पीएमपी बसने प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीची सोन साखळी नकळत काढून चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.