शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक

0
286

चिंचवड, दि.२९ (पीसीबी) – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास 150 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 28 डिसेंबर 2021 ते 7 फेब्रुवारी 2022 या कालावधीत थेरगाव आणि चिंचवड येथे घडला.

सुयेश मित्तल उर्फ रवी जैन, मनोज उर्फ राजवीर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय माधवराव देशपांडे (वय 30, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ते बेंगलोर येथील दोन कंपन्यांमध्ये व्यवस्थापक असल्याचे भासवून फिर्यादी यांना शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. गुंतवणुकीवर 150 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी ऑनलाईन आणि रोख स्वरुपात एकूण 11 लाख रुपये आरोपींना दिला. मात्र त्यांचे पैसे व मोबदला न देता आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.