पिंपरी, दि. २८ – ऑनलाइन माध्यमातून वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील अशा बहाण्याने एका महिलेची वीस लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 15 मार्च ते 19 मार्च या कालावधीत हिंजवडी फेज दोन येथे घडला.
याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क केला. त्यांना ऑनलाइन माध्यमातून टास्क देऊन ते टास्क पूर्ण केल्यास मोठा मोबदला मिळेल असे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादी कडून वेळोवेळी वीस लाख 16 हजार 856 रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.