राहुल गांधींवरच्या कारवाईचा २०२४ च्या निवडणुकित मोठा फायदा

0
197

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.याबाबतचे आदेश जरी करण्यात आले आहे. अशातच राहुल गांधी यांच्याविरुद्ध झालेल्या या कारवाईनंतर त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून आले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात काँग्रेस जोरदार आंदोलनाच्या तयारीत आहे असे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

मात्र राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची किंवा बरोबर हे ठरवण्याआधी त्यांना संपूर्ण देशातून काँग्रेस आणि राहुल गांधी यांना मिळत असलेली सहानुभूती केंद्रातील मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा ठरू शकेल कारण विविध मुद्दयावरून सध्या देशात मोदी सरकार सिरोधात एक वेगळ वातावरण निर्माण झालं आहे. या वातारणामुळे कुठेतरी मोदी सरकार विरोधात नागरिकांमध्ये रोष आहे.

अशातच राहुल गांधी यांची रद्द करण्यात आलेल्या खासदारकीमुळे काँग्रेसला फायदा होती असेच चित्र सध्या दिसून येत आहे . मागील काही दिवसांपासून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संबंध असलेल्या उदयॊगपतींवर राहुल गांधी सातत्याने बोलत असून याच मुद्द्यावरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले होते त्यात मोदी नावावर आक्षेप घेतल्यामुळे करण्यात आलेल्या कारवाईचा राहुल गांधी आणि काँग्रेसला येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीला नक्कीच फायदा होणार आहे