जागेवर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाकडून दोघांना मारहाण

0
311

चाकण, दि. २८ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाने दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 25) खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.

संदीप सोपान कड (वय 38, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवदास किसन कड (रा. वाकी बुद्रुक, ता. खे) आणि त्याचे 30 ते 40 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराजवळ असलेल्या जागेचा ताबा घेण्यासाठी आरोपी आले. फिर्यादीच्या मालकीच्या वाहिवाटीच्या जागेत अनधिकृतपणे ताबा घेत असताना त्यांना विरोध केल्याने आरोपींनी फिर्यादीस आणि त्यांच्या आईला मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.