सोशल मिडियावरून अश्लील मेसेज पाठवत महिलेचा विनयभंग

0
363

चाकण, दि. २७ (पीसीबी) – सोशल मिडियावर अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार 22 ते 26 मार्च या कालावधीत चाकण येथे घडला.

अतिश नरहरी कटारे (रा. शिंगवे, ता. निफाड, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतिश याने पिडीत महिलेला सोशल मिडियाच्या विविध खात्यावरून अश्लील व्हिडीओ आणि मेसेज करून शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.