महिलेवर लैंगिक अत्याचार अन जबरी चोरी

0
199

तळेगाव दाभाडे, दि. २७ (पीसीबी) – लग्नापूर्वीच्या मित्राबाबत पतीला सांगण्याची धमकी देत तरुणाने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच महिलेकडून पैसे आणि दागिने घेतले. तरुणाने महिलेला मारहाण केली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत तरुणाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. हा प्रकार 14 सप्टेंबर 2022 ते 23 मार्च 2023 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.

राहुल गौतम नाईवाडे (वय 27, रा. वराळे, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याने फिर्यादिसोबत बळजबरीने ओळख वाढवली. फिर्यादीच्या लग्नापूर्वी असलेल्या मित्राबाबत तिच्या पतीला सांगण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी महिला गरोदर असताना देखील तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. महिलेकडून राहुल याने वेळोवेळी 60 ते 70 हजार रुपये आणि सोन्याची साखळी जबरदस्तीने घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.