राहुल हे `गांधी` नव्हे `गंदगी`, पूनम महाजन यांची टीका

0
192

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) : राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात केलेल्या विधानाचे पडसाद सध्या दिल्लीत उमटत आहेत. यासाठी दिल्लीत भाजप खासदारांनी आंदोलन केलं. यावेळी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. राहुल हे गांधी नव्हे गंदगी आहेत, असं महाजन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या खासदारांनी दिल्लीत संसद भवन परिसरात राहुल गांधींविरोधात निषेध आंदोलन केलं. यामध्ये भाजपच्या मराठी खासदारांनीही सहभाग नोंदवला. यामध्ये पूनम महाजन, धनजंय महाडीक हे देखील सहभागी झाले होते. यावेळी महाजन म्हणाल्या, “राहुल गांधी यांनी सावकरांबाबत बोलताना म्हटलं होतं की, ते सावरकर नाहीत.

यासाठी मी त्यांना धन्यवाद देते की, ते सावकर होऊ पण शकत नाहीत तसेच ते गांधी पण नाहीत. स्वातंत्र्यवीर सावकरच नव्हे तर जे कोणी स्वातंत्र्य लढ्यात लढले त्यांचा आम्ही सन्मान करतो. पण ही अराजकतेची घाण जी राहुल गांधी पसरवत आहेत, त्यावरुन ते सुद्धा राहुल गांधी नव्हे तर राहुल गंदगी आहेत. जे या देशाला घाणीकडं घेऊन चाललेत हे मी सांगू इच्छिते”