फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत दीड लाखांची फसवणूक

0
252

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – बजाज फायनान्सच्या इसीएस ऑफिस बोरीवली येथून बोलत असल्याचे सांगत अनोळखी व्यक्तीने एका तरुणाची एक लाख 45 हजारांची फसवणूक केली. ही घटना 22 मार्च रोजी चिंचवड येथे ऑनलाईन माध्यमातून घडली.

हरीश शंकर मोळावडे (वय 28, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9771141581, 7294044772 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अनोळखी व्यक्तीने फोन केला. तो बजाज फायनान्स कंपनीच्या इसीएस ऑफिस बोरीवली येथून बोलत असून व्हेरिफिकेशन कॉल असल्याचे सांगून फिर्यादीस व्हिडीओ व्हेरिफिकेशन करण्याचा बहाणा केला. फिर्यादीच्या मोबाईलवर लिंक पाठवून फिर्यादीच्या बँक खात्याचा एक्सेस मिळवला. त्याआधारे एक लाख 45 हजारांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.