पोलिसांना मारहाण करून पळून जाणाऱ्या आरोपीस अटक

0
421

वाकड, दि. २६ (पीसीबी) – एका गुन्ह्यात परागंदा असलेल्या आरोपीला पकडत असताना आरोपीने पोलिसांना मारहाण करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. ही घटना 24 मार्च रोजी दुपारी सव्वा एक वाजता पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात घडली.

खंडू जालिंदर लोंढे (वय 23, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष बर्गे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बर्गे आणि पोलीस शिपाई खेडकर असे वाकड परिसरात गस्त घालत असताना सन 2022 मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी खंडू लोंढे कोकणे चौकात दिसला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता खंडू याने पोलिसांना मारहाण करून जखमी केले. तसेच त्याने पोलिसांच्या हाताला चावा घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.