राज ठाकरेंच्या विरोधात मुस्लिम तरुणाची पोलिसात तक्रार

bpcauthor bpcauthor
1 Min Read

वाकड, दि. २३ (पीसीबी) – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्या निमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे भाषण केले. यामध्ये ठाकरे यांनी भावना भडकावल्याचा आरोप करीत एका मुस्लिम तरूणाने पोलिसात धाव घेतली आहे. पिंपरी- चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

वाजीद रजाक सय्यद (रा. काळाखडक, वाकड) असे तक्रार केलेल्या तरुणाचे नाव आहे.

तक्रारी अर्जात तरुणाने म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी
स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी सभेचे आयोजन केले. भाषणात हिंदू-मुस्लिम समाजात भांडण होईल, असे शब्द वापरले. तसेच, मुस्लिम समाजाच्या भावनांना ठेस पोहचेल, असे व्यक्तव्य केले.

राज ठाकरे यांनी भाषण राजकीय दबावा खाली केले आहे. या भाषणामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात दंगे होऊ शकतात. त्यामुळे राज ठाकरेंवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, आगामी काळात अशा सभेला परवानगी देऊ नये. यापुढे माझ्या जीवाला थोडाही धक्का लागल्यास राज ठाकरे जबाबदार असतील, असेही तक्रार अर्जात म्हटले आहे.

Share This Article