रामजन्मोत्सवाची सुरुवात आज माजी नगरस्सेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते

0
248

चिंचवडगाव, दि. २३ (पीसीबी) : चिंचवडगावातील श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फ़े सालाबाद प्रमाणे यंदाही रामनवमी आणि हनुमानजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाची सुरुवात आज माजी नगरस्सेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आली. कलाटे दांपत्याच्या हस्ते श्री गणेश पूजन आणि श्री राम पूजन करून उत्सवाची सुरुवात झाली. यावेळी कलाटे कुटुंबीय उपस्थित होते.यावेळी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रावर कृपादृष्टी असून दे अशी प्रार्थना श्री रामरायाच्या चरणी केल्याचे राहुल कलाटे म्हणाले.